उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेत द्वंद्व, म्हणून सेना फुटली : आशिष शेलार | पुढारी

उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेत द्वंद्व, म्हणून सेना फुटली : आशिष शेलार

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेत द्वंद्व झाले. यामुळेच सेना फुटली. भाजपाने कोणताही पक्ष फोडलेला नाही, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. आशिष शेलार पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वत:च्या पक्षातील लोकांना तुरुंगात असताना बोलण्याचा अधिकार नाही. ही वैचारिक लढाई आहे, असे सांगत शेलारांनी नव्या मंत्रिमंडळावर टीका करणाऱ्यांवर टोला लगावला. आशिष शेलार पुढे म्हणाले की उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेत द्वंद्व आहे. अंतर्गत द्वंद्वामुळेच शिवसेना फुटली. उखाड दिया म्हणणारे तुरुंगात आहेत, अशीही टीका शेलार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांना पक्ष चिन्ह मिळावं. बाळासाहेबांच्या विचारांना वाढवणं, ही भाजपची भूमिका राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे निवडणूक आयोग नाही. बच्चू कडूंची नाराजी हा शिंदे गटाचा प्रश्न असल्याचेही शेलार यांनी नमूद केले.

Back to top button