लोकं गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल | पुढारी

लोकं गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : खरी शिवसेना कुणाची यासाठी पुरावे काय मागता? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. दोन्ही गटांना पुरावा सादर करावे लागणे हे दुर्दैवचं आहे. राज्याची जनता शिवसेनेचा पुरावा देईल, असे म्हणत राऊत यांनी बंडखोर गटावर टीका केली. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा इतिहास वाचवून दाखवत शिंदे गटावर त्यांनी हल्ला चढविला. सत्याचा खून केला जातोय. खरी शिवसेना कुणाची यासाठी पुरावे काय मागता? लोकं गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना माफ करणार नाही. बंडखोरी करणाऱ्यांना दिल्लीतून मान्यता मिळते.

यावेळी शिंदेच्या संभाव्य अयोध्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. तसेच आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Back to top button