नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय संघ टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकांचेे यजमानपद भूषवणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौर्यावर येणार आहे. यानंतर ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळल्या जाणार आहेत.
भारतीय संघ या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियात होणार्या विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा मुख्य संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पण, वन डे मालिकेत दुसरा भारतीय संघ भाग घेणार आहे. बीसीसीआय सूत्रांच्या माहितीनुसार, सचिव जय शाह यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे, आपल्याकडे ताकदीचे दोन संघ आहेत. त्यामुळे एक संघ टी-20 विश्वचषकासाठी रवाना होत असतानाच एक संघ तीन एकदिवसीय सामने खेळेल.
भारत वि. ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका :
20 सप्टेंबर – मोहाली
23 सप्टेंबर- नागपूर
25 सप्टेंबर- हैदराबाद
भारत वि. द. आफ्रिका टी-20 मालिका :
28 सप्टेंबर – त्रिवेंद्रम
1 ऑक्टोबर – गुवाहाटी
3 ऑक्टोबर – इंदूर
एकदिवसीय मालिका :
6 ऑक्टोबर – रांची
9 ऑक्टोबर – लखनौ
11 ऑक्टोबर – दिल्ली