राज्यातील 'या' जिल्ह्यांना १६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; १३ एनआरडीएफ आणि २ एसडीएफच्या टीम तयार | पुढारी

राज्यातील 'या' जिल्ह्यांना १६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; १३ एनआरडीएफ आणि २ एसडीएफच्या टीम तयार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यातील बऱ्याच ठिकाणी धुवाँधार पाऊस  सुरु आहे. भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस म्हणजे दिनांक १६ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon Update)

१६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; १३ एनआरडीएफ आणि २ एसडीएफच्या टीम तयार
१६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा; १३ एनआरडीएफ आणि २ एसडीएफच्या टीम तयार

सद्यस्थितीमध्ये राज्यातील परिस्थिती पुढील प्रमाणे

कोकण विभाग 

१. पालघर – जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 74.6  मिमी पाऊस झाला असून, सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील मुख्य नद्या इशारा पातळी पेक्षा कमी वाहत आहेत. घटनास्थळी पोलीस दल, अग्निशामन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांचेकडून माती दगड बाजूला करण्याचे काम चालू आहे. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती  नसून खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF चे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

 २. ठाणे-  जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF च्या एकुण पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 ३. मुंबई – रस्ते वाहतुक तसेच मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे  मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबई मध्ये NDRF च्या एकूण पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 ४. रायगड – जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नाही. तसेच कुंडलिका  इशारा पातळीवर वाहत आहे. खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF च्या एकुण दोन  टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

५. रत्नागिरी – जिल्ह्यातकोठेही पूरपरिस्थिती  नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे. खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF च्या एकुण दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

६. सिंद्धुदुर्ग – जिल्ह्यात  कोठेही पूरपरिस्थिती  नाही.  सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF ची एक टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

नाशिक विभाग

नाशिक जिल्ह्याकरिता पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी पात्राताील पाणयात वाढ झाली आहे. खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF ची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

नंदुरबार – जिल्ह्यात  कोठेही पूरपरिस्थिती  नाही.

पुणे विभाग 

पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूरपरिस्थिती सामान्य असून,  कोठेही पूरपरिस्थिती  नाही.

तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे.

कोल्हापूर – सद्यस्थितीत जिल्ह्यात कुठेही पुरपरिस्थिती नाही. खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF च्या एकुण दोन  टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

नागपुर विभाग

नागपुर विभागातील गडचिरोली जिल्ह्यात खबरदारी उपाय म्हणून जिल्ह्यात  NDRF च्या एकुण दोन  टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button