Monsoon updates Live : मुंबईसह राज्यात धुवाॅंधार, विदर्भातील १३० गावांचा संपर्क तुटला | पुढारी

Monsoon updates Live : मुंबईसह राज्यात धुवाॅंधार, विदर्भातील १३० गावांचा संपर्क तुटला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस पावसाने चांगलाच जोर लावला आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पाऊस मुसळधार सुरु आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने जनजनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुक यंत्रणा कोलमडली आहे. राज्यातील बरीच गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून येथील ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहे. आज १३ जूलै रोजी सकाळी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाणी पातळी ३५ फूट २ इंच इतकी होती.
मराठवाड्यात पावसामुळे शेतीचे नुकसान बरेच झाले आहे. आठपैकी 7 जिल्ह्यांतील तब्बल 387 गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या 40 दिवसांत विभागात 111 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साक्री तालुक्यातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
गेले दोन आठवडे सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रत्येक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवार, दि. १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. या कालावधीत जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Monsoon updates Live :

भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पालघर, रायगड, रत्नाजगरी, नाजिक, पुणे, कोल्हापूर,  गडजिरोली या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस म्हणजे दिनांक १६ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सकाळपासून पाऊस सुरु आहे.

गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर; १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने परिसरातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

सिरोंच्या तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नदीमधील वाढलेल्या पाणी पातळीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तालुक्यातील १२ गावांमधील नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये सिरोंचा रै (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दिकुंठा, जानमपल्ली वे. लँ., मृदुक्रिष्णापुर, आयपेठा रै, सोमनूर माल अंशतः, नडिकूडा, कोत्तूर रै, असरअल्ली, अंकिसा कंबाल पेठा टोला या गावांचा समावेश आहे.

वसई वाघरालपाडा येथे दरड कोसळली, दोन जण ढिगाऱ्याखाली सापडल्याची भीती

वसई : वसई पूर्व राजावली भगत असलेल्या वाघराल पाडा येथे दरड कोसळली असून कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली चार जण दबले गेले. त्यातील दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दोन जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न शीघ्र कृतीदल करत आहे.

गोदावरीला पूर, ग्रामस्थांना अलर्ट. गंगापूर, दारणा धरणातून विसर्ग.
ठाणयात रेल्वे ट्रॅकवर काही प्रमाणात पाणी. वाहतुकीवर फारसा परिणाम नाही.
नांदेड जिल्ह्यात मुसळधार, आल्लापल्ली भामरागड मार्ग बंद. विदर्भात १३० गावांचा संपर्क तुटला.
वसईत दरड कोसळली, अनेकजण अडकले

१३ जूलै २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत

राजाराम बंधारा पाणी पातळी ३५ फूट २ इंच
पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट
पंचगंगा नदी धोका पातळी ४३ फूट
एकुण पाण्याखालील बंधारे ५४

हेही वाचलंत का?

Back to top button