Eknath Shinde : बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे | पुढारी

Eknath Shinde : बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरुपौर्णिमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत कायम राहतील. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम माझ्यासह ५० आमदार करत आहेत. त्यांच्या विचारानेच राज्याचा कारभार चालविला जात आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच एक सर्वसामान्य शिवसैनिक इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकला. सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम युतीचे सरकार करेल. शेतकरी, वंचित, शोषित, उपेक्षित यांच्या न्याय हक्कासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना दिली.

राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि बाधित लोकांपर्यंत मदत वेळेत पोहोचावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आपत्कालीन सेवा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button