उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकांचा मातोश्रीबाहेर रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने या शिवसैनिकाचे निधन झाले.

शहापूर तालुक्यातले भगवान काळे हे मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते. त्यांना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची होती, वाशाळा गाव येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन ते आपल्या गाडीने वांद्रे कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानी आले होते. मातोश्रीत बैठक सुरु असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. भगवान काळे यांना नंतर कलानगरच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रस्त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 हे ही वाचा :

Back to top button