नेमके कशासाठी बंड केले; बंड करणाऱ्यांनी स्वत:ची कार्यशाळा घ्यावी : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंड करणाऱ्यांनी स्वत:ची एकदा कार्यशाळा घ्यावी, बंडामागचं कारण नेमकं काय होतं हे अगोदर ठरवा असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले. लोकसभेत शिवसेनेचे प्रतोद म्हणून राजन विचारेंची निवड झाली आहे. आगामी काळात पक्षाला पुर्णवेळ प्रतोदची गरज आहे. हेही यावेळी त्यांनी सांगितले.
बंडाचं नेमकं कारण काय? – संजय राऊत
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारले होते. नेमके का बंड पुरकारले होते. एक एक करत चाळीसच्यावर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांना जावून मिळाले होते. नेमके काय कारण असावं बंडाच याबाबत अंदाज लावले जात होते. बंडाबाबतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यासह नेत्यांनाही प्रश्न पडले होते. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, नेमके का बंड केले हे बंडखोर आमदारांनी सांगावे. त्यांनी गोंधळून जावू नये. मी त्यांचा गोंधळ समजू शकतो.
सर्व आरोपानंतर माझ्यावरही आरोप झाले
बंड करणाऱ्या आमदारांनी कारण ठरवण्यासाठी स्वत:ची कार्यशाळा घ्यावी. बंडामागचं कारण नेमकं काय होतं हे ठरवा आधी. या बंडखोरांनी जनतेला गोंधळात टाकू नये. पक्षात इतर नेते हस्तक्षेप करता म्हणून, राष्ट्रवादीने निधी दिला नाही म्हणून की, हिंदुत्वासाठी गेला? मग हिंदुत्वासाठी गेला म्हणता मग २०१४ च्या निवडणूका भाजपाशिवाय हिंदुत्वावरच तर निवडून आला ना? मग नेमके काय कारण होतं असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नक्की का पक्ष सोडला हे ठरवा तुम्ही, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी बंडखोरांना लावला. बंडादरम्यान माझ्यावरही आरोप केले गेले. राष्ट्रवादी पक्षावरही आरोप केले गेले. मी सरकारी कामात लक्ष घालत नाही. उद्धव ठाकरेंना सारख भेटत नाही. असेही यावेळी त्यांनी सांगितले.
आनंदराव अडसुळ यांच्यावर ईडीच्या कारवाईचा दवाब होता. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर असे दवाब होते. जितेंद्र नवलानी यांची चौकशी थांबवण हे दुर्देव्य आहे. चौैकशी ज्या कारणासाठी सुरु केली आणि का चौकशी थांबवली हे जितेंद्र नवलानी यांची चौकशी करणाऱ्यांनी जनतेला सांगाव. शरद पवारांबद्दल सर्वच नेते बोलतात. महाराष्ट्रातील नेत्याबद्दल बोलायच नाही तर कोणाबद्दल बोलायच हे तरी सांगा.. शहाजीबापुनी सांगाव, असा खोचक टोला त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना लगावला आहे.
हेही वाचलंत का?