पदवी देण्याच्या बहाण्याने गंडा | पुढारी

पदवी देण्याच्या बहाण्याने गंडा

पुणे: पुढारी वृत्तसेवा: इंजिनिअरिंगचा बनावट पदवी वाटप घोटाळा उघडकीस आला असून, याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अहमदनगर येथील एका संस्थेसह सबिल एफ सय्यद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरिदास यांनी फिर्याद दिली आहे. अहमदनगर येथील भारतीय तकनिंधान आणि व्यवसाय प्रबंधन अध्यायन संस्थान, युथ आयकॉन हेडक्वाटर्स या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिदास यांना पदवी देण्याच्या आमिष दाखवून त्यापोटी 50 रूपये भरण्यास भाग पाडले. भारतीय तकनिकी अनुसंधान आणि व्यवसाय प्रबंधन अध्यायन संस्थान, युथ आयकॉन हेडक्वाटर्स यांनी अनधिकृतपणे शैक्षणिक संस्था स्थापन केली. संस्थेच्या संपर्कात आलेल्यांना इंजिनिअरिंग व मेडिकलच्या अनधिकृत बनावट पदव्या विकल्या.

Back to top button