शरद पवार बोलतात त्याच्या उलट होत असते : प्रवीण दरेकर | पुढारी

शरद पवार बोलतात त्याच्या उलट होत असते : प्रवीण दरेकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात होणार्‍या नाराजीमुळे शिंदे सरकार अवघ्या सहा महिन्यात कोसळेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले. यावर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी ” शरद पवार साहेब बोलतात त्याच्या उलटं होत असतं, सहा महिने टिकेल म्हणतात; पण याउलट येणारे काही दशकं सरकार असेल” असे म्हटलं आहे.

दरेकर म्हणाले, पहिली अग्निपरीक्षा पास झालो आहे. आजही आश्चर्यकारक बहुमत मिळेल. शिंदे सरकारला बहुमत चाचणीत १६४ मते होतील. २ मते प्रकृतीच्या कारणास्तव येऊ शकली नाहीत. नवीन सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आनंदी असल्याचा दावाही त्‍यांनी केला.

शिंदे सरकारच्या आज होणार्‍या शक्‍तीपरीक्षेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी शिंदे सरकार अवघ्या सहा महिन्यात कोसळेल. मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा, असे वक्तव्य केले होते.

हेही वाचलंत का ?

Back to top button