जून महिन्यात मालवाहतूकीतून मध्य रेल्वे मालामाल!7.19 दशलक्ष टन मालवाहतूक | पुढारी

जून महिन्यात मालवाहतूकीतून मध्य रेल्वे मालामाल!7.19 दशलक्ष टन मालवाहतूक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेने मालवाहतूक लोडिंगमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जून महिन्यात तब्बल 7.19 दशलक्ष टन मालवाहतूक नोंदवली आहे, जी आतापर्यतची सर्वाधिक आहे. गेल्या जून महिन्यात केलेल्या 5.97 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यातील मालवाहतुकीत 20.44 टक्केंची वाढ झाली
आहे

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी रेल्वेने मालवाहतुकीवर विशेष भर देण्याचे ठरवले. मालवाहतुकीसाठी खास वेळापत्रक तयार केले आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या तीन महिन्यात 21.62 दशलक्ष टन मालवाहतूक केली. तर एप्रिल ते जून 2021 या कालावधीत 18.54 दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. जून महिन्यात मुंबई विभागातील धरमतर पोर्ट साइडिंगवरून आयातीत कोळशाचे 30 रेक लोड केले.

नागपूर विभागाने 901 कोळशाचे रेक तर, बल्लारशाह येथून लोहखनिजाचे 64 रेक लोड केले आहेत. ऑटोमोबाईल्सचे 68 रेक, अन्नधान्याचे 25 रेक आणि साखरेचे 101 रेक लोड केले. याशिवाय जिप्समचे 3 आणि फ्लाय ऍशचे 5 रेक यांसारख्या नवीन वस्तू देखील लोडींग केल्या आहेत. गेल्य दोन वर्षांपासून रेल्वेने विविध उपक्रम राबविल्याने मालवाहतुकीत वाढ झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.

Back to top button