शिवसेना राष्ट्रवादी सेना कधी झाली हे बाप लेकाला कळलेच नाही, सदाभाऊ खोत यांचे खोचक ट्विट | पुढारी

शिवसेना राष्ट्रवादी सेना कधी झाली हे बाप लेकाला कळलेच नाही, सदाभाऊ खोत यांचे खोचक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क :अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना ही राष्ट्रवादी सेना कधी झाली हे बाप लेकाला कळेलच नाही” असे ट्विट करत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडीला डिवचलं आहे.  या ट्विटमध्ये त्यांनी बाप लेक कोण आहेत असा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)  आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकारण पार विकोपाला गेले आहे. या सत्तासंघर्षामूळे महाराष्ट्रातील राजकीय स्थैर्य धोक्यात आले आहे. गेले नऊ दिवस शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांचा गट गुवाहाटीत तळ ठोकून बसला आहे.

सोशल मीडियावर तर आरोप-प्रत्यारोप वॉर सुरु आहे. नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. आज माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत महाविकास आघाडीला डिवचलं आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना ही राष्ट्रवादी सेना कधी झाली हे बाप लेकाला कळेलच नाही”. उद्या विधानसभेत ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सदाभाऊंनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.  

हेही वाचलं का? 

Back to top button