माझ्या बदनामीमागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात : सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुरुवारी (दि. १६ जून) रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी आमदार सदाभाऊ खोत व त्यांचा ताफा पंचायत राज बैठकीच्या निमित्ताने  सांगोला (जि. सोलापूर) गेले असताना तेथील एका हॉटेल मालकाने त्यांना अडवून हॉटेलमधील उधारीची मागणी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. आज सकाळी या प्रकरणासंबंधी माध्यमांशी बोलत असताना सदाभाऊंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. या प्रकरणात टोमॅटोसारखा गाल लाल असलेल्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे एक षडयंत्र – सदाभाऊ खोत

हे बिल प्रकरण एक षडयंत्र आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याचा हात आहे ज्याचे गाल टोमॅटोसारखे लाल आहेत, असा आरोप सदाभाऊंनी केला. २०१४ पासून मी सांगोल्याला जातोय पण कधी बिलाची मागणी केली नाही. पण आताच कशी मागणी केली. बिलाची मागणी करणारा हॉटेल मालक शिनगारे हा एक गुन्हेगार आहे, तो वाळूमाफिया आहे. त्याच्या नावावर सात गुन्हे असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. या प्रकरणाची  सखोल चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे  करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

या व्हिडिओसाठी तयारी केली होती. शिनगारे याला जेवढे सांगितले गेले होते, तेवढीच वाक्ये तो बोलत होता. हा व्हिडिओ जाणिवपूर्वक करुन काढून व्हायरल केला गेला आहे. त्याने जे काही आरोप केले आहेत त्यांना मी घाबरत नाही. राष्ट्रवादीच्या या राजकीय खेळीमुळे माझा आवाज दाबता येणार नाही, असही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

2014 च्या लोकसभा निवडणुकीतील 66 हजार 460 रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना सांगोला पंचायत समितीच्या आवारात अडवून धरत जाब विचारला. ते कारमधून खाली उतरताच भाऊ आपला पैशाचा विषय मिटवा म्हणून अडविले. यावेळी अचानक घडलेल्या प्रकारामुळे गोंधळ उडाला.

यावेळी सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सारवासारव करीत असतील पैसे तर देऊन टाकू असे म्हणून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेले. पंचायत राज्य समितीच्या सांगोला दौर्‍यात काल बुधवारी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांचे सांगोला पंचायत समितीच्या आवारात आगमन होताच ते कारमधून खाली उतरले त्यावेळी कार्यकर्त्याच्या गर्दीतून अचानक मांजरी ता. सांगोला येथील हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी त्यांना आडवून भाऊ माझे सन 2014 मधील हॉटेलच्या बिलाचा विषय मिटवा असे म्हणून त्यांना रोखले अचानक या प्रकारामुळे सर्वांचे लक्ष त्या दोघांच्या चर्चेकडे वळले यावेळी शिनगारे यांनी या बिलासाठी मी 8 वर्षे वाट पाहिली, मी सदा भाऊंना बिलासंदर्भात फोन केला असता त्यांनी मला लेखा मी आता मंत्री झालोय, तुझं रं कसं बिल असे बोलून अपमानीत केले असा आरोप करीत ते काही नाही माझ्या बिलाचा विषयी मिटवा आणि मगच येथून जावा असे म्हणाला असता मंत्री सदा भाऊनी तुम्हच्या बिलासंदर्भात मला काहीच माहिती नाही असे म्हणताच हॉटेल मालकांनी तुमचा मुलगा सागर याला सगळे माहित आहे मला कोणी समजवायचे गरज नाही असे बोलत असताना भाऊंनी असेल बील तर देऊन टाकू असे म्हणून गर्दीतून खाली मान घालून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले.

पहा व्हिडीओ : या व्हिडिओसाठी तयारी केली होती- सदाभाऊ खोत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news