Bhagat Singh Koshyari: राज्यपालांना डिस्चार्ज, लवकरच महाराष्ट्रात… | पुढारी

Bhagat Singh Koshyari: राज्यपालांना डिस्चार्ज, लवकरच महाराष्ट्रात...

पुढारी ऑनलाईन : 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजत आहे. डिस्चार्जनंतर ते थेट राजभवनावर येतील. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान त्यांची प्रकृती ठिक असल्याने त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे राजभवनातील सूत्रांकडून कळत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर मुंबईतील एका खाजगी हॉस्पिलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय अस्थिरतीच्या परिस्थित राज्यपालांना मिळणारा डिस्चार्ज हा काही वेगळेच राजकीय संकेत देत असल्याचे कळत आहे. राज्यपालांच्या डिस्चार्जनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे. यावरून सध्या राजकारणात वेगळीच ट्विस्ट येताना दिसत नाही.

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी शिवसेनेविरूद्ध बंडखोरी करत गुहाटीमध्ये तळ ठोकळा आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नविन गटाची स्थापणा करत त्याला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ अशा नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नसल्याचे सांगत. तुम्ही तुमच्या बाबाचे नाव वापरा असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंवर केला.

शिवसेनेच्या या राजकीय नाट्याने सर्वसामान्य तळागाळातील शिवसैनिक हा आक्रमक झाला आहे.
संतप्त शिवसैनिक महाराष्ट्रात ठिकठिकाणी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर राग करताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या डिस्चार्जनंतर महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवाट लागू होईल का? यावर अनेक मतमतांतरे ऐकायला मिळत आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारीना डिस्चार्ज; डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे मानले आभार

योग्य निदान आणि उपचार केल्याबद्दल मी विशेषतः डॉ. सम्राट शाह यांचे आणि वेळोवेळी सल्लामसलत केल्याबद्दल डॉ शहांक जोशी आणि डॉ समीर पगड यांचे आभार मानतो. तसेच मी सर्व परिचारिका, अधिकारी, कर्मचारी आणि HN रिलायन्स हॉस्पिटलच्या संपूर्ण कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी माझी इतक्या चांगल्या प्रकारे काळजी घेतली,असे राज्यपालांनी ट्वीट करत, त्याच्यावर उपचार करणाऱ्याचे आभार मानले आहेत.

हेही वाचा:

Back to top button