लोणंद : आनंदराव शेळके-पाटील यांच्याविरोधात काहींनी कुभांड रचले : हर्षवर्धन शेळके-पाटील | पुढारी

लोणंद : आनंदराव शेळके-पाटील यांच्याविरोधात काहींनी कुभांड रचले : हर्षवर्धन शेळके-पाटील

लोणंद; पुढारी वृत्तसेवा : लोणंद नगरपंचायतीच्या सभेमध्ये जेष्ठ नेते आनंदराव शेळके – पाटील यांनी माळी समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही विधान केल नाही. त्यांनी अपशब्द काढले असे कुभांड काहींनी रचले असल्याचा आरोप युवा नेते हर्षवर्धन शेळके – पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात म्हटले आहे की, कचरा प्रकल्पावरून आनंदराव शेळके -पाटील यांनी निष्कारण खर्च करू नये, असे मत व्यक्‍त केले. नगरपंचायतीची स्वमालकीची जागा असलेल्या जागेत हा प्रकल्प व्हावा व त्यासाठी सभोवताली असलेल्या जागेतून माळी समाजाच्या व्यक्तींनी या जागे पर्यंत जाण्यास रस्ता द्यावा हे मत व्यक्त केले.

काही मंडळींनी या प्रकरणास राजकीय झालर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माळी समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही वक्‍तव्य केले नाही. त्यांच्याविरोधात काहींनी कुंभाड रचले आहे. समाजात तेढ निर्माण होइल असे कोणतेही काम करायचे नाही. 6 महिन्यांपासूनचा नगरपंचायतीचा कारभार अयशस्वी झाला आहे. प्रशासनाच्या अयोग्य कामाविषयीच्या घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नगरपंचायत सत्ताधारी हवालदिल झालेले आहेत. त्यातूनच हे केल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button