राज्यातील परिस्थितीवर पूर्ण लक्ष : बाळासाहेब थोरात | पुढारी

राज्यातील परिस्थितीवर पूर्ण लक्ष : बाळासाहेब थोरात

मुंबई : पुढारी ऑनलाईन : राज्यातील परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे. आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. महत्त्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा केली जाईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आता कायद्याची लढाई सुरू झाली आहे, असेही थोरातांनी नमूद केले. मुख्यमंत्री मातोश्रीवरून बैठकीसाठी रवाना झाले असून ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी थोड्याच वेळात शिवसेना भवनात उपस्थित राहणार आहेत.

Back to top button