खेड तालुक्यात भूमाफियांचा सुळसुळाट | पुढारी

खेड तालुक्यात भूमाफियांचा सुळसुळाट

चाकण : पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्यात भूखंडमाफियांनी पुन्हा फणा उगारला आहे. राजकीय मंडळी आणि प्रशासन अशा मंडळींची पाठराखण करीत असल्याचा सामान्य नागरिकांचा आक्षेप आहे. स्थानिक शेतकरी आणि नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी गेलेल्यांच्या जमिनी गिळंकृत करणारी मोठी यंत्रणा खेड तालुक्यात कार्यरत आहे. यामुळे आयुष्यभर सांभाळलेल्या जमिनींवर पाणी सोडण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

खेड तालुक्यात जमिनींना सोन्यापेक्षाही जास्त भाव आल्याने भूखंडमाफियांची नेहमीच मोक्याच्या जागांवर वक्रदृष्टी राहिली आहे.  गोरगरीब शेतकर्‍यांच्या जमिनींचे प्रशासनाला हाताशी धरून खोटे वाद निर्माण करून त्यांना हतबल करण्याचे फंडे तालुक्यात वापरले जात आहेत. संबंधितांचे राजकीय लागेबांधे झुगारून भूमाफियांचा बीमोड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

श्रीरामपूर : दिंडीतील वारकर्‍यांना मोफत औषधोपचार

भूमाफियांना पाठबळ कुणाचे?
शहरात राजकीय पाठबळ असलेल्यांकडून भूखंडमाफियांच्या मदतीने जागा बळकाविण्याचे सत्र सुरू आहे. यासाठी राजकीय पाठबळ असलेले गुंडगिरी करणारे अनेक जण लहान-मोठ्या गुंडांना सांभाळतात. अशा लोकांच्या टोळ्या दररोज शहरातील जमिनींची माहिती काढणे, त्यातील लोकांना धमकावणे, जमिनीवर सरळ पाट्या ठोकणे, या उद्योगांमध्ये गुंतलेले असतात. या लोकांना कोणत्या ठिकाणी कोणता गट नंबर आहे, त्यावर मालकी कुणाची आहे, याची संपूर्ण माहिती असते.

जागा बळकाविण्यासाठी काही दिवस लागतात. एकदा वाद निर्माण केला, की त्यांचे बरेच काम हलके होते. वाद निर्माण करण्यापर्यंत बराच कालावधी लागतो. खोटे वाद तालुका प्रशासनासमोर दाखल होतात. प्रशासन आणि पोलिस ठाण्याचा आधार घेऊन मूळ मालकांना त्रस्त केले जात आहे. बळाचा वापर करून मूळ मालकाला त्रास दिला जात आहे. या प्रकारामुळे जागेचा मूळ मालक हतबल होतो. खेड तालुक्यात चाकण आणि राजगुरूनगर व लगतच्या ग्रामीण भागात अशी शेकडो प्रकरणे वादग्रस्त आहेत.

हेही वाचा

सोलापूर : मोटरसायकल स्‍पेअर पार्टच्या दुकानाला आग; लाखो रूपयांचे नुकसान

सोलापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू

राहुरी : विद्यार्थ्यांंमध्ये पेटंट संस्कृती आणणे गरजेचे : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

 

Back to top button