दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्‍ती ; आज पत्रकार परिषदेत भूमिका स्‍पष्‍ट करणार | पुढारी

दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्‍ती ; आज पत्रकार परिषदेत भूमिका स्‍पष्‍ट करणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या प्रवक्तेपदी माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन गटाची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

विधानसभा उपाध्‍यक्षांना आमच्‍या गटाला मान्‍यता द्यावीच लागेल : केसरकर

या नियुक्तीनंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आमच्या गटाला ताबडतोब मान्यता द्यावी. आमच्या गटाकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे उपाध्यक्षांना आमच्या गटाला मान्यता द्यावीच लागेल. ज्यांच्याकडे कमी आमदार आहे त्यांच्या गटाला गटनेतेपद कसेकाय देता येईल? असा सवाल केसरकर यांनी केला.

आमदारांच्या कार्यालय आणि घरावर हल्ला केला जातो हे चुकीचे आहे. जे काय करायचे ते विधानसभेच्या सभागृहातच घडेल. अशाप्रकारे जनतेला त्रास देणे चुकीचे आहे. आम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहे. आमच्यावर फक्त पक्षाचा अधिकार नाही. त्यामुळे चाललेला हिंसाचार ताबडतोब थांबवावा, असेही केसरकर म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button