नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
२००२ गोध्रा ट्रेन नरसंहारासंबंधी उच्च पदाधिकाऱ्यांना तसेच इतर संस्थांना 'क्लीन चीट' देण्याच्या 'एसआयटी'च्या क्लोजर रिपोर्टविरोधात जाकिया जाफरी यांच्या वतीने दाखल याचिका नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या निकालाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे. गुजरात दंगली संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत, हे सिद्ध झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी १९ वर्षे लढा दिला. या मुद्यावर त्यांनी एकही शब्द न बोलता भगवान शंकरांने केलेल्या 'विषप्राशन'प्रमाणे त्यांनी वेदना सहन केल्या, असे अमित शहा यांनी 'एएनआय'च्या संपादक स्मिता प्रकाश यांना दिलेल्या मुलाखतीत
( Amit shah interview) म्हटलं आहे.
यावेळी अमित शहा म्हणाले, " मी मोदीजींना हे दुःख सहन करताना जवळून पाहिले आहे. सत्याच्या बाजूने असूनही आरोपांना तोंड देताना आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे ते काहीही बोलले नाहीत. हे फक्त खंबीर मनाचा माणूसच करू शकतो. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मोदीजी काहीही बोलले नाहीत; जेणेकरून या प्रकरणी कोणताही प्रभाव पडू नये. त्यांनी हे सर्व शांतपणे सहन केले," असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.
माझ्या पक्षातील मोठ्या नेत्यावर विरोधी पक्ष निराधार आरोप करत होते, हे आता स्पष्ट झाले आहे. २४ जून रोजी सर्वोच्च
न्यायालयाने यासंदर्भात दिलेला निकाल हा पक्षातील सर्वोंसाठी अभिमानाचा विषय आहे. तत्कालिन गुजरात सरकारने
त्यावेळी परिस्थिती योग्यरित्या हाताळणी त्यामुळेच परिस्थिती नियंत्रणात आली. सर्वोच्च न्यायालयाने ३०० पानांच्या निकालपत्रात सर्वबाबींचा खुलासा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी त्याकाळात अनेक बैठका घेतला. तसेच शांततेसाठी राज्यातील नागरिकांना आवाहन केले. हेही आता स्पष्ट झाले आहे. आज खर्या अर्थाने सत्याचा विजय झाला असून, नरेंद्र मोदी यांचा विजय झाला आहे, असेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले.
या प्रकरणी तत्कालिन गुजरात सरकारने विशेष तपास पथकाला (एसआयटी ) सर्व माहिती दिली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करावी, अशी मागणी न्यायालयाने केलीच नव्हती. ही मागणी एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) केली होती. गुजरात सरकारने याला मान्यता दिली. सरकारच्या वतीने सर्व माहिती 'एसआयटी'ला सातत्याने देण्यात आली. कोणतीही माहिती गुजरात सरकारने दडपली नाही, असेही अमित शहा यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा :