Tweet Of Nana Patole : काँग्रेस उद्धव ठाकरेंच्‍या पाठिशी : नाना पटाेलेंची स्‍पष्‍टाेक्‍ती | पुढारी

Tweet Of Nana Patole : काँग्रेस उद्धव ठाकरेंच्‍या पाठिशी : नाना पटाेलेंची स्‍पष्‍टाेक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे जाे निर्णय घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विट करत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. शिवसेनेचे आमदार फुटणं यामागे भाजपाचं आहे हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे, असा आराेपही त्‍यांनी केला आहे. (Tweet Of Nana Patole)

विधान परिषद दहा जागांसाठी निवडणूका झाल्या. या दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळले. पुरेसे संख्‍याबळ नसतानाही भाजपने राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीतही यश मिळवले. या निवडणुकीच्‍या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत गुजरातमधील सूरत गाठले. यानंतर राज्‍यातील सत्तानाट्य रंगले. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  फेसबूक लाईव्हच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील जनतेशी संवाद साधला. रात्र वर्षा बंगलाही साेडला. ते  मातोश्री’ बंगल्यावर राहायला गेले आहेत. दरम्‍यान, सेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे यांनी ४२ आमदारांसह शक्तिप्रदर्शन केले आहे.

उद्धव ठाकरेंच्‍या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे की, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे घेतील त्‍या निर्णय काँग्रेसचा पाठिंबा असेल”. (Tweet Of Nana Patole ) यापूर्वी त्यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट करत त्यांनी भाजपावर आपला निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे की, शिवसेनेचे आमदार फुटणं यामागे भाजपाचं आहे हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे !

हेही वाचलंत का? 

Back to top button