देवेंद्र फडणवीस 'नॉटरिचेबल', राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण | पुढारी

देवेंद्र फडणवीस 'नॉटरिचेबल', राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि राज्‍यात राजकारणात सत्ता नाट्याचा थरार सुरु झाला. आता एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांबरोबर आसाममधील रॅडिसनं हॉटेलमध्‍ये तळ ठोकून आहेत. राज्‍यातील घडामाेडी वेगावल्‍या असताना  आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ‘नॉटरिचेबल’ असल्‍याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे राज्‍यात सत्तातराच्‍या हालचाली वाढल्‍या असून फडणवीस हे पुढील रणनीती ठरविण्‍यात व्‍यस्‍त असल्‍याच्‍या चर्चेला उधाण आले आहे.

२० जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला. निकालानंतर मंगळवारी पहाटे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्‍या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सूरत शहर गाठलं. मंगळवारी सकाळी राज्‍यातील राजकारणात एकच खळबळ माजली. यानंतर राज्‍यातील राजकीय घडामोडींना कमालीच वेग आला. यानंतर सूरतमधून बंडखोर एकनाथ शिंदे व आमदार यांनी आसाममधील गुवाहाटी येथे पोहचले. बुधवारी सायंकाळी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्‍पष्‍केली. यानंतर त्‍यांनी रात्री वर्षा बंगलााही सोडला. यानंतर राज्‍यातील सत्तांतराच्‍या चर्चा वेगावली आहे.

एकीकडे राज्‍यातील राजकीय वुर्तळातील घडामोडी कमालीच्‍या वेगावल्‍या असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे माध्‍यमांसाठी ‘नॉटरिचेबल’ असल्‍याचे वृत्त समाले आले आहे. फडणवीस हे लवकरच एकनाथ शिंदे गटाबरोबर राज्‍यात सत्ता स्‍थापन करतील. ते सध्‍या पुढील राजकीय रणनीती आखण्‍यात व्‍यस्‍त आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सध्‍या भाजप अत्‍यंत सावधपणे पुढील रणनीती आखत आहे. त्‍यामुळेच देवेंद्र फडणवीस हे माध्‍यमांसाठी ‘नॉटरिचेबल’ असल्‍याचीही चर्चा आहे.

हेही वाचा :

Back to top button