राज्यातील राजकीय परिस्थिती पाहूनच निर्णय : बाळासाहेब थोरात | पुढारी

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहूनच निर्णय : बाळासाहेब थोरात

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणात आज नवीन वातावरण निर्माण झाले आहे. आवश्यक असेल तर महाविकास आघाडी एकत्र बसून चर्चा करेल. राज्यातील राजकीय घडामोडींबाबत परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय होऊनही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ‘नॉटरिचेबल’ असल्याने राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या राजकारणात आज नवीन वातावरण निर्माण झाले आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मुख्यमंत्र्यांसोबतही बोलणे झाले आहे. आवश्यक असेल तर महाविकास आघाडी एकत्र बसून चर्चा करेल. काँग्रेसच्या आमदारांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संध्याकाळी सह्याद्रीवर एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा?

Back to top button