पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणूक मतदानाला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी नेते दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदान केले. महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल. माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील. निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार प्रमुख नेत्यांसह विधानभवनात पोहचले. भाजपचे आमदार दोन बसेसमधून विधानभवनात दाखल झाले. भाजपचे तीनही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होतील असा दावा भाजपचे आमदार अतूल भातकळकर यांनी केला आहे. मॅन ऑफ द मॅच फडणवीस असतील, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होण्याआधी शिवसेनेच्या आमदारांना विधानभवनाच्या पक्ष कार्यालयात बोलवण्यात आले होते. एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
हेही वाचलंत का?