पुणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत मंगळवारी | पुढारी

पुणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत मंगळवारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत 31 मे रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.
सोडतीसाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले असून, 30 मे रोजी रंगीत तालीमही होणार आहे.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने महापालिका निवडणुका नेमक्या केव्हा होणार, याबाबत अनिश्चितता आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला आहे. पुणे महापालिकेसाठी येत्या 31 मे रोजी 173 सदस्य संख्या असलेल्या 58 प्रभागांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठीच्या 50 टक्के आरक्षित जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

‘सिंचन’ची आऊटसोर्सिंगमध्ये बनवेगिरी

सोडतीसाठी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाईव्ह प्रसारण करणे, स्टेजवर, तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. ’आरक्षणांची सोडत चिठ्ठ्यांद्वारे करण्यात येणार असून, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते या चिट्ठ्या काढण्यात येणार आहेत. सोडतीसाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने याठिकाणी पोलिस बंदोबस्तासोबतच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button