Madhuri Pawar : माधुरी पवार म्हणते "आणा लाल मोठी गाडी' (Video) | पुढारी

Madhuri Pawar : माधुरी पवार म्हणते "आणा लाल मोठी गाडी' (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार सध्या एका गाण्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आता ‘आणा मला जरतारी साडी, साडीसंगे आणा लाल मोठी गाडी’ असे धमाल शब्द असलेल्या ‘लाल मोठी गाडी’ या नव्या म्युझिक व्हिडिओतून प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. सप्तसूर म्युझिकचा हा युट्युब चॅनेलवर लाँच करण्यात आलाय. माधुरी पवारनं या धमाल गाण्यावर ठुमके लगावले आहेत.

साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. गाण्याचं लेखन माधवी देवळणकर यांनी केलं आहे, तर अमेय मुळे यांचं संगीत असलेलं हे गाणं लरिसा अल्मेडा या नव्या गायिकेनं गायलं आहे. संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अंकित शिंदे आणि दिव्या घाग ह्यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

ठसकेदार आणि दिमाखदार अशी ही लावणी नव्या ढंगातली आहे. धमाल शब्द आणि उडती चाल असलेलं हे गाणं लगेचंच ऐकणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं.

 

Back to top button