मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेने दुसर्या जागेवर आपला उमेदवार निश्चित केला असताना, भाजप तिसरी जागा लढण्याच्या तयारीत आहे. या तिसर्या जागेवर माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव चर्चेत आहे. भाजपने तिसरी जागा लढविली, तर राज्यसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
भाजपकडे असलेले संख्याबळ पाहता भाजपचे दोन सदस्य सहज निवडून जातात. एका उमेदवाराला जिंकण्यासाठी 42 मतांचा कोटा लागणार आहे. भाजपकडे 106 मते आहेत. त्यामुळे दोन उमेदवार निवडून येऊन 22 मते शिल्लक राहणार आहेत. याशिवाय रत्नाकर गुट्टे, महेश बालदी, रवी राणा, राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे हे अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत. जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हेही भाजपसोबत आहेत. मनसेचे राजू पाटील यांचे मत भाजपला मिळू शकते. त्यामुळे भाजपकडे 29 मते स्पष्ट आहेत. त्यामुळे भाजप तिसरी जागा लढण्याच्या तयारीत आहे.