पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसी समाजाला आरक्षण आणि त्यांचे सर्व अधिकार मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद करताना सांगितले.
मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात पुन्हा एखाद्या ओबीसी आरक्षण आणि निवडणूका या मुद्यांच्या चर्चेला उधाण आले आहे. सर्वेाच्च न्यायालयाने निवडणूक ही ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर विचारले असता, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निवडणूकीचा फॉर्म भरेपर्यंत आरक्षणासाठी आमचा प्रयत्न राहील. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीबाबत आदरणीय शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. तसेच ओबीसी समाजाचाला त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी मी प्रयत्न करेन.