पुढारी ऑनलाईन डेस्क : भोंग्यांच्या राजकारणाने हिंदूंचे मोठे नुकसान झाले आहे. भोंग्यांचा विषय आता संपलाय. राजकीय भोंगे आता बंद झाले आहेत. सध्या देशातील जनता महागाईशी लढत आहे, त्यामुळे सत्तेतील सरकारने आता भोंगा सोडून महागाईवर बोलावे, असे असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
राज्यातील जनता सुज्ञ आहे त्यामुळेच इथे भोंग्याचे राजकारण चालले नाही. भारतात भोंग्यासंदर्भात राष्ट्रीय धोरण लागू करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केंद्राला केले आहे. महागाईबाबत विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन वादात न पडता, देशातील महागाईवर लक्ष द्यावे आणि जनतेशी यासंदर्भात बोलावे. सत्तेमधील नेत्यांनीही भोंग्याऐवजी महागाईवर बोलावे. देशातील एकही नेता महागाईवर बोलायला तयार नाही, हे दुर्दैव्य आहे.