मुंबई : विलेपार्ले LIC कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग | पुढारी

मुंबई : विलेपार्ले LIC कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील विलेपार्ले येथील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीतून मोठ्या प्रमाणात धूराचे लोट येत आहेत.  सकाळी सात वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. घटनास्थळी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आग कोणत्या कारणामुळे लागली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीची झळ दुसऱ्या मजल्यावरील पगार बचत योजना विभाग, इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर, फाइल रेकॉर्ड, लाकडी फर्निचर पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  आगीमुळे अनेक एलआयसी पॉलिसी होल्डर्स (ग्राहक) च्या कागदपत्रही जळून खाक झाल्याची शक्यता आहे.

Back to top button