मुंबईत उद्या लसीकरण बंद | पुढारी

मुंबईत उद्या लसीकरण बंद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर उद्या (मंगळवार) अक्षयतृतीया आणि रमझान ईद निमित्त लसीकरण बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर सुरू असलेले हे कोविड लसीकरण बंद राहणार आहे.

दरम्‍यान, बुधवार (ता. 4) पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Back to top button