Superstar Yash : कन्नड चित्रपटसृष्टीचा ‘यश’ ठरतोय भारताचा नवा सुपरस्टार! | पुढारी

Superstar Yash : कन्नड चित्रपटसृष्टीचा ‘यश’ ठरतोय भारताचा नवा सुपरस्टार!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कन्नड चित्रपटसृष्टीचा अभिनेता यश (Superstar Yash) याला आज संपूर्ण देशात ओळखले जात आहे. यशच्या केजीएफ चॅप्टर २ (KGF Chapter 2) या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने सात दिवसात बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने असे अनेक विक्रम केले आहेत ज्याला यापूर्वी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांनी देखिल स्पर्शही केलेला नाही. साऊथचे अनेक दिग्गज अभिनेते सुपरस्टार बनले आहेत. त्यांचा सुपरस्टारपद आपण अनुभवले आहे आणि अनुभवतो आहे. पण यशच्या रुपात कन्नड चित्रपटसृष्टीतून पहिल्यांदाच सुपरस्टार येत आहे. यशच्या निमित्ताने आपणास पहायला मिळत आहे. पण यशची ‘रॉकी भाई’ बनून संपूर्ण देश व्यापण्याची कथा काही सोपी नाही. त्यामागे त्याचा मोठा संघर्ष आणि कष्ट आहे. यशच्या मागे मोठे घराणे नाही अथवा मोठा वारसा देखिल नाही तरीही यशने जे यश मिळवले आहे ते सर्वाच्याच भूवया उंचावणारे आहे. फक्त अभिनयाची आवड, जिद्द आणि त्यासाठी सोसावे लागणारे कष्ट या जोरवार कसा काय बनला यश सुपरस्टार, चला पाहुया.

आज पर्यंत तामीळ, तेलगु आणि मल्याळम चित्रपटातील सुपरस्टार यांनी आपली वेगळी ओळख बॉलिवूडला करुन दिली आहे. यातील काही कलाकारांनी बालिवूडमध्ये स्वत:चा ठसा देखिल उमटवला आहे. या पुर्वी आपण रजनिकांत, कमल हसन, नागार्जुन, चिरंजीवी, व्यंकटेश मामुट्टी, मोहनलाल यांना ओळखत होतो. यानंतर महेश बाबु, अल्लू अर्जुन, रामचरण, प्रभास, विजय सेतुपती, जोसेफ विजय, ज्युनिअर एनटी आर, नागा चैतन्य, दलकूर सलमान, रवी तेजा आणि विजय देवराकोंड आदींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि दाक्षिणात्य कलाकार म्हणून यांना अवघा देश ओळखत आहे. पण, आता कर्नाटकातून सुद्धा नवा सुपरस्टार आला आहे. यश (Superstar Yash) उर्फ नवीन कुमार गौडा याने आता आपण साउथचा नवा सुपरस्टार असल्याचे सिद्ध केलं आहे. त्याने केजीएफ चॅप्टर १ द्वारे दाखवून दिलं की आता कन्नड सिनेमा अवघ्या देशभरात आपला प्रभाव टाकायला सिद्ध झाला आहे. त्यानंतर केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाने अधिकृत रित्या कन्नड चित्रपटाचा दबदबा अधिकृत रित्या सिद्ध केला आहे. शिवाय हे सिद्ध केलं आहे यश या अभिनेत्याने.

यशचे (Superstar Yash) खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. त्याचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील बूवनहल्ली गावात झाला. त्याचे वडील अरुण कुमार बस चालक आहेत. तर आई पुष्पा गृहिणी आहे. त्याला एक धाकटी बहीण आहे आणि त्याने आपला अधिक काळ म्हैसूरमध्ये घालवला आहे. पण, त्याला अभिनयाची आवड होती. अभिनयाची भूक भागविण्यासाठी यशने बी.व्ही. कारंथ यांच्या नाटक कंपनी भाग घेतला आणि या ठिकाणी त्याने अभिनयाचे धडे गिरवले.

यशने २००४ मध्ये ‘नंदा गोकुळा’ या टीव्ही सीरियलमधून आपल्या अभिनयच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला. पण २००८ मध्ये त्याने ‘मोगीना मांशु’ या चित्रपटातून पदार्पण केले. ती सहाय्यक भूमिका होती. पण या वर्षी तो ‘रॉकी’ या चित्रपटात दिसला आणि या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद मिळाल. पुढे २०१३ मध्ये आलेला गुगली हा त्याचा त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. पण, २०१८8 मध्ये KGF ने त्याला संपूर्ण भारताचा स्टार बनवला आणि रॉकी भाईचे घराघरात नाव पोहचले. केजीएफ चॅप्टर १ नंतर केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून यशचे चाहते करत होते. केजीएफ चॅप्टर २ ने जे आज यश मिळवले आहे ते पाहता यश येत्या काही काळातला सुपर स्टार ठरणार हे स्पष्ट झाले आहे.

Back to top button