

पुढारी ऑनलाईन डेस्क : राणा दाम्पत्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून मातोश्री बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राणा दाम्पत्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याचबरोबर हे आंदोलन गनिमी काव्याने केले जाईल. तसेच वेशांतर करून हे आंदोलन केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यावर "राणांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही" असा धमकीवजा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला. त्यांनी म्हटले आहे की शिवसेनेचं हिंदूत्व 24 कॅरेट सोन्याप्रमाणे आहे.
राणा दाम्पत्यांनी काही दिवसांपूर्वी हिंदूत्वाची आठवण करून देण्याच्या उद्देशाने मातोश्री बाहेर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. या आंदोलनाचे स्वरूप त्यांनी हनुमान चालिसा पठण करून होणार असल्याचे स्पष्ट केले होते. राणा दाम्पत्यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर गर्दी केली आहे.
राणा दाम्पत्यांच्या या आंदोलनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली. राणांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. राणा दाम्पत्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्याचबरोबर हे आंदोलन गनिमी काव्याने केले जाईल. तसेच वेशांतर करून हे आंदोलन केले जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. नंदागिरी गेस्टहाऊसवर राणांचे बुकिंग असल्याने या गेस्टहाऊसबाहेर पोलिसबंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
राणांचा मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण हा स्टंट आहे. हा आम्ही उधळून लावणार. हनुमान चालिसेला आमचा विरोध नाही, पण याचा वापर जर मातोश्रीबाहेर आंदोलनाकरिता करणार असल्याने आम्ही याला विरोध करणार असं मत यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केलं.
हेही वाचा