मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बसेस ठेवल्या बंद | पुढारी

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बसेस ठेवल्या बंद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेच्या बेस्ट (BEST buses) उपक्रमातील ठेकेदाराने तीन महिन्यांपासून पगार न दिल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बसेस बंद ठेवल्या आहेत. एमपी नावाच्या या कंत्राटदाराकडे पाच डेपोला बसचालकासह बस पुरवण्याचे कंत्राट आहे. बांद्रा, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या डेपोतील सुमारे ५०० चालक यांनी बसेस बाहेर काढल्या नाहीत. सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशाचे हाल झाले आहेत. (BEST buses)

एम पी ग्रुपच्या कंत्राट दाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या १७५ बसगाड्या वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. परंतु, कामगारांचे वेतन न दिल्यामुळे वडाळा वांद्रे आणि विक्रोळी या आगारांमधून आज एकही बस गाडी आतापर्यंत बाहेर पडलेली नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमाने इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून स्वतःच्या ८६ बस गाड्या प्रवर्तित केलेल्या आहेत. सदर कंत्राटदार विरुद्ध कंत्राटातील अटी आणि शर्थीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

Back to top button