Sanjay Raut : “नोटिसा आम्हाला पण येतात पण आम्ही तमाशे करत नाही” | पुढारी

Sanjay Raut : "नोटिसा आम्हाला पण येतात पण आम्ही तमाशे करत नाही"

पुढारी ऑनलाईन डेस्क  

फोन टॅपिंग आणि बदली घोटाळा प्रकरणातील माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी केली. राज्यभर या चौकशीविरोधात भाजपकडून निदर्शने करण्यात आली होती.  दरम्यान,  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी (दि. १४, सोमवार) पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “नोटिसा आम्हाला पण येतात पण आम्ही तमाशे करत नाही”. असे राऊत यांनी म्हटले आहे.

चार राज्यांतील विजयाचा उन्माद भाजपकडून सुरू आहे. सभागृहाच कामकाज चालले पाहिजे, लोकांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. पण दुर्देवाने असं चित्र  पाहायला मिळत नाही, अशीही  टीका त्यांनी केली.

निवडणुकीला वेेगळा रंग दिला जातो. केंद्रीय यंत्रणांना विरोधी नेत्यांविरोधात टार्गेट दिले जाते. पंतप्रधान देशाचे असताता त्यांना खुजं करु नका,  पंतप्रधान यांनीही यातून बाहेर पडायला पाहिजे. गोव्याचे राजकारण हे विचित्र आहे. गोव्यात निवडणुकीनंतर नेहमीच वाद होतो. गोव्यात पक्ष कधी जिंकत नाहीत तर व्यक्ती जिंकत असते. त्या व्यक्ती  सरकार बनवतात. हे लक्षात घेतले पाहिजे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

हेहा वाचलंत का?

Back to top button