आज अंगारकी संकष्टी, चंद्रोदय ९. ५९ मिनिटांनी | पुढारी

आज अंगारकी संकष्टी, चंद्रोदय ९. ५९ मिनिटांनी

मुंबई ; पुढारी ऑनलाईन :  गणपती बाप्पांच्या पूजनाने शुभ कार्याची सुरुवात केली जाते. प्रत्येक महिन्यात दाेनवेळा संकष्टी चतुर्थी येते. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्‍हणतात. आज (दि. २७) रोजी अंगारकी संकष्‍टी असून, चंद्रोदय ९. ५९ मिनिटांनी आहे.

अधिक वाचा 

आजच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात. गणपतीला मोदक प्रिय असल्याने गणेशभक्‍त मोदकांचा नैवेद्यात आवर्जून समावेश करतात.

अधिक वाचा 

संकष्टी  निमित्त  भाविक दिवसभर उपवास करतात.  चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला नैवेद्य दाखवल्‍यानंतर उपवास साेडला जाताे. आज रात्री ९.५९ मिनिटांनी चंद्रोदय आहे.

अधिक वाचा 

काेराेना प्रतिबंध उपायांसाठी मंदिरे बंद आहेत. आज अंगारकी संकष्टी निमित्त गणेशभक्‍त घरातच गणपतीचे पूजन करणार आहेत. काही मंदिरांनी गणेशभक्‍तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्‍यवस्‍था केली आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्‍हिडीओ : बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…

Back to top button