औरंगाबाद : भांडी घासत नाहीत म्हणून आईची मुलीला मारहाण | पुढारी

औरंगाबाद : भांडी घासत नाहीत म्हणून आईची मुलीला मारहाण

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद येथे मन हेलावून टाकणारी घटना काल घडली आहे. यात घरात मुलगी भांडे घासत नाही, कपडे धुताना निरमा- साबण जास्त वापरते यामुळे आईची मुलीला बेदम मारहाण केल्‍याचा प्रकार उघडकीस आला.

वय अवघं दहा वर्षे. आई घरातील सर्व कामे करायला लावते. यात थोडं ही कुठं काही चुकलं तर ती बेदम मारहाण करते. या रोजच्याच प्रकाराला कंटाळून मुलीने रागाच्या भरात चक्क घर सोडलं. आकाशवाणी चौकात ओक्साबोक्शी रडणारी मुलगी दामिनी पथकाच्‍या नजरेत पडल्यावर सोमवारी (दि.२६) रोजी रात्री दामिनी पथकाने विचारपूस केल्यावर हा प्रकार समोर आला.

नियंत्रण कक्ष येथून कॉल आल्याने दामिनी पथक तत्काळ आकाशवाणी चौकातून जवाहर नगर येथील पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यासोबत नाकाबंदी पॉईंटवर पोहोचले. या दरम्यान त्यांच्याजवळ दहा ते अकरा वर्षाची मुलगी होती. मुलीस घेऊन दामिनी पथक कैलासनगर येथे पोहचले.

मुलीला सविस्तर माहिती विचारली असता तिने माझे आई-वडील आम्ही शॉपिंगला आलो होतो. आणि मी चुकून हरवले असे सांगितले. परंतु, मुलीचे बोलणे खोटं वाटत असल्याचे पाेलिसांना जाणवले.

मी भांडी घासले नाहीत म्हणून…

यानंतर मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिने सांगितले, मी पुंडलिकनगर येथे राहते. मला माझ्या आईने खूप मारहाण केली आहे. माझी आई मला घरातील सर्व काम करायचे लावते.

आज माझ्याकडून चुकून कपड्याचा निरमा जास्त पडल्यामुळे व मी भांडी घासले नाहीत म्हणून माझ्या आईने मला वायरने मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे  मी चालू सुद्धा शकत नाही, असेही तिने सांगितले.

मला माझ्या आईची खूप भीती वाटते म्हणून मी पायी- पायी चालत कैलास नगर येथे माझ्या आत्याच्या घरी आले. परंतु, माझी आत्या पण धुणी-भांडी करते. ती देखील सध्या घरी नाही. म्हणून मी जालना रोडवर उभी राहिले होते. मला खूप वेदना होत असल्‍याचे तिने पाेलिसांना सांगितले.

मुलीच्‍या पायावर आईने वायरिंगने मारहाण केलेल्या खूणा दिसून आल्‍या.

हेही वाचलंत का?

पाहा : बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…

Back to top button