

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विजय वडेट्टीवार : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ९ जिल्ह्याला पूराचा फटका बसला आहे. या पुरामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे. घरांचे, दुकानांचे व शेतकऱ्यांच्या पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सध्या प्रशासन झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामा करत आहे. मात्र, तातडीची मदत म्हणून राज्य सरकारने जाहीर केली आहे. यात ज्या नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
त्यांना गरजेच्या वस्तू आणण्यासाठी व घरखर्चासाठी तातडीने १० हजार रुपये दिले जाणार आहेत तर ज्यांचे अन्नधान्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पाच हजारांची मदत दिली जाईल अशी घोषणा मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
दुसरीकडे, १० किलो तांदुळ, १० किलो गहू, ५ किलो तुरडाळ आणि ५ लिटर केरोसन आदींचे वाटप केले जात आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आदी ९ जिल्ह्यांचे पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा प्रशासन घेत आहे.
सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार विविध भागातील नुकसानीची पाहणी करत आहेत.
संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. पंचनामे केले जात आहेत.
सध्या तातडीची मदत म्हणून १० व ५ हजार रुपयांची जाहीर केली आहे. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
पुढील दोन दिवसात राज्यातील नुकसानीचा अंदाज घेऊन मदत जाहीर केली जाणार आहे.
हे ही वाचलं का?