कोरोना लसीकरण : महाराष्ट्राने गाठला ४ कोटी लसीकरणाचा टप्पा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याने कोरोना लसीकरण मोहिमेत गती घेतली. कोरोना लसीकरण मोहिमेची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मंगळवारी पुन्हा विक्रम प्रस्थापित केला.
राज्यात लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. मंगळवारी दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले.
अधिक वाचा :
- पेगासस हे भारताला बदनाम करण्याचे षड्यंत्र : देवेंद्र फडणवीस
- अदानी समुहाने विमानतळ मुख्यालय हलविले गुजरातला
- gold rate : सोन्याचे दर एका महिन्याच्या उच्चांकी स्तरावर
देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आज (दि. २०) दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या चार कोटींवर गेली.
त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या तीन कोटी सहा लाख ९९ हजार ३३९ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ एवढी आहे.
आज (दि. २०) दुपारपर्यंत राज्यात एक लाख २० हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
अधिक वाचा :
- चंद्रावर चे पहिले पाऊल ते खासगी यानाने अंतराळ पर्यटन
- भगतसिंह कोश्यारी यांनी नौदल अधिकाऱ्यांचा केला गौरव
- हवामान बदल यामुळे घटू शकते माणसाची उंची
डेल्टा व्हेरियंट ४० ते ६० टक्क्यांहून अधिक संसर्गजन्य : डॉ.एन.के अरोडा
कोरोना डेल्टा व्हेरियंट हा अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत जवळपास ४० ते ६० टक्क्यांहून अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो वेगाने पसरू शकतो, असा दावा भारतीय सार्स-कोव्ही-२ जीनोमिक्स कंसोर्टियमचे सहअध्यक्ष डॉ.एनके अरोडा यांनी केला आहे. कोरोना डेल्टा व्हेरियंट विरोधात देशात उपलब्ध सर्व लशी प्रभावी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बी.१.६१७.२ म्हणजेच डेल्टा व्हेरियंट पहिल्यांदा ऑक्टोबर २०२० मध्ये भारतात सापडला. देशात कोरोनाची दुसरी लाटेकरीता या व्हेरियंटला जबाबदार धरले जात आहे.
देशात नव्याने आढळणार्या कोरोनाबाधितांमध्ये जवळपास ८०% रूग्ण या व्हेरियंटनेग्रस्त आहेत. अल्फाच्या तुलनेत हा व्हेरियंट जवळपास ४० ते ६० टक्क्यांहून अधिक वेगाने पसरतो. ब्रिटेन, अमेरिका, सिंगापूरसह ८० हून अधिक देशात हा व्हेरियंट पसरला असल्याचे डॉ.अरोडा म्हणाले.
महाराष्ट्रात आढळलेला डेल्टा व्हेरियंट देशाच्या मध्य तसेच पूर्वेकडील राज्यात पोहचण्यापूर्वी पश्चिमेकडील राज्यासह उत्तरेकडील राज्यात पोहचला. डेल्टा व्हेरियंट शरीरात वेगाने वाढतो तसेच फुफ्फुसांवर अधिक सूज निर्माण करतो.
आयसीएमआरकडून करण्यात आलेल्या अभ्यासानूसार देशात उपलब्ध सर्व लशी डेल्टा व्हेरियंटविरोधात प्रभावी असल्याचे ते म्हणाले.