21 गोवंश जनावरांची वाहतूक करणारी पिकअप जप्त ; रस्त्याच्या कडेला वाहन सोडून चालक फरार | पुढारी

21 गोवंश जनावरांची वाहतूक करणारी पिकअप जप्त ; रस्त्याच्या कडेला वाहन सोडून चालक फरार

देवळा : पुढारी वृत्तसेवा
देवळा – मालेगाव रस्त्यावरुन अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन पिंपळगाव वाखारी येथे ग्रामस्थांंनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.21) सकाळी आठ वाजेच्या सुमारास देवळ्याहून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या पिकअपमध्ये गोवंश जनावरे दिसून आले. ही जनावरे बेकायदेशीर कत्तलीच्या उद्देशाने मालेगावला नेली जात असल्याचा जागरुक नागरिकांना संशय आला. त्यामुळे वाहन रोखण्यात आले. चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन सोडून पोबारा केला. वाहनात 21 जनावरे कोंबून भरली होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन वाहन व जनावरे ताब्यात घेण्यात आली. जनावरे गोशाळेत रवाना केली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. वाहनाच्या चेसीनंबर वरुन त्याच्या मालकाचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरच प्रकार उघड होईल.

हेही वाचा;

Back to top button