Nagarapanchayat election result : भाजप नंबर एकचा पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध : फडणवीस | पुढारी

Nagarapanchayat election result : भाजप नंबर एकचा पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध : फडणवीस

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यातील विविध जिल्ह्यातील नगरपंचायतींचे निकाल ( Nagarapanchayat election result ) हाती आले आहेत. या निकालानंतर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रीया ट्विटरद्वारे दिली . धनदांडगे, मनी आणि मसलपॉवर आणि महाविकास आघाडीच्या धोरणांना नाकारत राज्यातील जनतेने पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने कौल दिल्याने जनतेचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ एक असे सलग तीन ट्वीट करत मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे, मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राज्यातील तमाम भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो. या सर्वांच्या प्रयत्नामुळे भाजपला हे मोठे यश मिळाले आहे. ( Nagarapanchayat election result )

तसेच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाले आहे. तसेच तमाम मतदारांचे देखिल आभार व्यक्त करतो की त्यांनी महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणांना नाकारले. मोठ्या बहुमताने भाजपला निवडूण पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहे. ( Nagarapanchayat election result )

महाविकास आघाडी कडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेचा गैरवापर करुन देखिल जनतेने भाजपच्या परड्यात यश टाकले. भाजपने ३० हून अधिक नगरपालिकेत सत्ता प्राप्त केली तर ४०० हून अधिक सदस्याने जिंकून येत पुन्हा एकदा भाजप नंबर एकचा पक्ष असल्याचे सिद्ध झाल्याचे देवेंद्र फडणवीस सांगितले आहे.

Back to top button