नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचे निकाल ; पहा कोणी कुठे मारली बाजी | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचे निकाल ; पहा कोणी कुठे मारली बाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क 

नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा व देवळा या सहा नगरपंचायतींचे सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-

निफाडमध्ये शिवसेना सत्तेत 

एकुण जागा- 17

शिवसेना-07

शहर विकास आघाडी-04

राष्ट्रवादी कॉंग्रेस-03

कॉंग्रेस-01

बसपा-01

अपक्ष-01

निफाड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवून माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार आणि अनिल कुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि निफाड शहर विकास आघाडी सत्तेवर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त तीनच जागा येऊ शकल्या आहेत.

विजयी उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे-
प्रभाग १ : अरूंधती पवार (बसपा),
प्रभाग २ : किशोर ढेपले (अपक्ष),
प्रभाग ३ : अनिल कुंदे (शिवसेना),
प्रभाग ४ : शारदा नंदू कापसे (शिवसेना),
प्रभाग ५ : पल्लवी जंगम (काँग्रेस),
प्रभाग ६ : साहेबराव बर्डे (शहर विकास आघाडी), प्रभाग ७ : विमल जाधव (शिवसेना),
प्रभाग ८ : सुलोचना धारराव (शिवसेना),
प्रभाग ९ : सागर कुंदे (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग १० : डॅा. कविता धारराव (शिवसेना),
प्रभाग ११ : संदीप जेऊघाले (शिवसेना),
प्रभाग १२ : रत्नमाला कापसे (शिवसेना).
प्रभाग 13 : रूपाली विक्रम रंधवे शिवसेना
प्रभाग 14 : जावेद शेख राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 15 : किरण कापसे राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग 16 : कांताबाई कर्डिले शहर विकास आघाडी प्रभाग 17 : अलका निकम शहर विकास आघाडी

दिंडोरी शिवसेनेला सर्वांधिक जागा

एकुण जागा-17

शिवसेना-06

राष्ट्रवादी-05

भाजप-04

कॉंग्रेस-02

अपक्ष-00

दिंडोरी नगरपंचायतीचा संपूर्ण निकाल हाती लागला असून एकुण 17 जागांपैकी शिवसेनेला सर्वांधिक म्हणजे 6 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. प्रांरभी शिवसेनेची एक जागा बिनविरोध झाली होती. तर कॉंग्रेसला 2 व राष्ट्रवादीला 5 जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपला केवळ 4 जागा मिळाल्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना आपल्याच मतदार संघात जोरदार धक्का बसला आहे.

कळवण मध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

एकुण जागा 17

राष्ट्रवादी कॉंग्रेस -09

कॉंग्रेस -03

शिवसेना-02

भाजप-02

मनसे-01

कळवण नगरपंचायतीवर महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला- 9 जागा, भाजप पक्षाला 2 जागा, कॉंग्रेस- 3 जागा, मनसे-1 जागा, शिवसेना-2 जागा असा विजय मिळवला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निकालात बाजी मारली आहे.  तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पेठ राष्ट्रवादीकडेच

एकुण जागा-17

राष्ट्रवादी कॉंग्रेस- 08

शिवसेना- 04

माकप-03

भाजप-01

अपक्ष-01

पेठ मध्ये राष्ट्रवादीने 8 जागा पटकावत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मापकला 3, भाजप आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा प्राप्त झाली आहे. मागील पाचवर्षापासून पेठ मध्ये शिवसेनेची सत्ता होती, मात्र यावेळी शिवसेनेला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

सुरगाणा, देवळ्यात भाजप वरचढ 

सुरगाणा 

एकुण जागा-17

भाजप-8

शिवसेना-06

माकप-02

राष्ट्रवादी कॉंग्रेस-01

सुरगाण्यात भाजप पक्ष वरचढ ठरला आहे. एकुण सतरा पैकी आठ जागा भाजपने पटकावल्या आहेत. तर दुस-या स्थानावर शिवसेनेला (06) जागांवर विजय मिळवता आला आहे.

देवळा नगरपंचायत

एकुण जागा-17

भाजप-15

राष्ट्रवादी-02

देवळा नगरपंचायतीत एकुण 17 जागांपैकी भाजपने 15 व राष्ट्रवादी उरलेल्या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

हेही वाचा

 

Back to top button