शाळांची घंटा सोमवारपासून पुन्हा वाजणार ? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या.. | पुढारी

शाळांची घंटा सोमवारपासून पुन्हा वाजणार ? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या..

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राज्यात ओमायक्रॉनचे संकट वाढू लागल्यानंतर शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सडकून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी अधिकार देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सद्यस्थिती तसेच भविष्यातील धोक्यांचा विचार नियमांचा विचार केला आहे. कालातंराने आणखी यामध्ये विचार केला जाईल. मुलांचे आरोग्यही महत्त्वाचे असून त्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत.

कोरोना कालखंडात शाळांवर मोठी गदा आली आहे. त्यामुळे राज्यातील इतर कार्यक्रम सुरु असताना शाळाच बंद कशासाठी अशी विचारणा होऊ लागली आहे. अनेक तज्ज्ञांनी शाळा बंद करण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. त्यामुळे शाळांबाबत पुनर्विचार करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही संकेत दिले होते.

दरम्यान, काल (ता.१८) राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीमध्येही राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button