Indian Army : सलाम...जिथं चिनी लोक थरथर कापतात, तिथं आमचे जवान व्हॉलिबॉल खेळतात; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Indian Army : सलाम...जिथं चिनी लोक थरथर कापतात, तिथं आमचे जवान व्हॉलिबॉल खेळतात; व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Indian Army) उन्हाळा असो वा हाडे गोठवणारी थंडी… भारतीय लष्करातील जवान कोणत्याही वातावरणात, प्रतिकूल परिस्थितीत देशाचे संरक्षण करत असतात. भारतीय जवानांची ताकद साऱ्या जगाला माहित आहे. हवामानाची पर्वा न करता ते देशाच्या सीमेवर हिमालयासारखे उभे असतात. सध्या थंडी जास्त आहे. कालपासून सोशल मीडियावर जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये भारतीय जवान बर्फात व्हॉलिबॉलने खेळत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ बघून अनेकांनी जवानांना सलाम केला आहे. एवढ्या बर्फातही जवान जोशमध्ये असल्याचं दिसत आहे.

(Indian Army) आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. यामध्ये अनेक सैनिक बर्फामध्ये व्हॉलिबॉल कोर्टवर प्रचंड बर्फवृष्टीमध्ये खेळ खेळताना दिसत आहेत. जवानांचे पाय बर्फात बुडत आहेत. तरीही जवान फुटबॉल खेळत आहेत.

अनेक युजर्संनी हा व्हिडिओ शेअर केलायं. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. ‘जिथं बर्फाळ वारा खंजीर सारखा येतो. तिथं या उत्साहानं खेळणं खरंच अतुलनीय आहे..!’ अजून एका यूजरने लिहिले की, ‘जिथे चिनी लोक थरथर कापतात, तिथे आमचे सैनिक व्हॉलिबॉल खेळतात. जय भारत.’ अशा कमेंट आल्या आहेत. (Indian Army)

नुकताच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओ उदमपूरने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टवर एक जवान तैनात असल्याचे दिसून येते. बर्फ जास्त पडत आहे. गुडघाभर बर्फातही हे जवान आपले कर्तव्य बजावत आहे. हा व्हिडिओ काश्मीर बॉर्डरचा आहे. (Indian Army)

हेही वाचलत का?

Back to top button