बीड: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास अटक

बीड: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास अटक

Published on

दिंद्रूड, पुढारी वृत्तसेवा : दिंद्रूड पोलिस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना 20 जून रोजी घडली होती. या प्रकरणात दिंद्रूड पोलिसांत अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंद्रूड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बीडमधून या दोघांना ताब्यात घेतले.

दिंद्रूड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील नागझरी येथील सचिन तोंडे या युवकाने फूस लावून पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून 21 जून रोजी दिंद्रूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.दिंद्रूड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी तत्काळ दखल घेत मोबाईल लोकेशनवरून हे युगल बीड येथे असल्याची माहिती मिळवली. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकत अल्पवयीन मुलीला व आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी रात्री केली.

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बाब उघड झाल्यामुळे आरोपीविरुद्ध अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील प्रकरण दिंद्रूड पोलिसांनी माजलगाव येथील पिंक मोबाईल पथकाकडे सोपविण्यात आले आहे. पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, पोलिस कॉन्स्टेबल माया मस्के प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news