Nashik : तीन दिवसांत 385 किलोमीटरचा प्रवास, लासलगाव सायकलिंगचे सदस्य पांडुरंग चरणी लीन

Nashik : तीन दिवसांत 385 किलोमीटरचा प्रवास, लासलगाव सायकलिंगचे सदस्य पांडुरंग चरणी लीन
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील सायकलिंग असोसिएशनच्या सदस्यांनी अवघ्या तीन दिवसांत लासलगाव-पंढरपूर हे सायकल राइड पूर्ण केले व पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. तीन दिवसीय सायकल राइडमध्ये लासलगाव, येवला, कोपरगाव, नगर, टेंभुर्णी, पंढरपूर असा 385 किलोमीटरचा प्रवास करीत पांडुरंगाचे दर्शन घेतले. सोमवारी सकाळी हे सर्व सदस्य पुन्हा लासलगावमध्ये परतले.

या सायकल राइडमध्ये लासलगाव सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल ब्रह्मेच्या, संजय पाटील, डॉ. अनिल ठाकरे, डॉ. उत्तम रायते, डॉ. किरण निकम, संजय कदम, सुनील ठोंबरे, तुषार लोणारी, महेश वर्मा, रियाज शेख, विजय वैद्य, शरद भामरे, गणेश औटी, सागर खांबेकर, व्यंकटेश वाबळे, सिद्धार्थ डागा, सुनील शिंदे, विजय कुंदे, तुषार लोणारी, श्रेयांश कांकरिया, अमोल गंगेले, अरुण थोरे यात सहभागी झाले होते.

या सर्व सायकलपटूंना लासलगाव सायकलिंग असोसिएशनचे सदस्य तुषार लोणारी यांच्या वतीने फुलेबाबा मठामध्ये महाप्रसाद उपलब्ध करून देण्यात आला होता. बॅक-अप व्हॅनमध्ये प्रल्हाद पाटील, अ‍ॅड. सुनील उगलमुगले, आप्पा ठाकरे यांनी जबाबदारी सांंभाळली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news