

नगर: पुढारी वृत्तसेवा: नगर मधील प्रतिष्ठित व उच्चभ्रू नागरिक सभासद असलेल्या अहमदनगर क्लबच्या निवडणुकीमध्ये उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या नेतृत्वाखाली एकता पॅनेलने 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व मिळविले. प्रगती पॅनेलला अवघी एक जागा मिळाली. सचिवपदी नरेंद्र फिरोदिया विक्रमी मतांनी विजयी झाले. शहराच्या व्यापारी व उद्योजक वर्तुळात महत्त्वाची संस्था म्हणून अहमदनगर क्लब ही संस्था ओळखली जाते. अहमदनगर क्लबच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन सायंकाळी लगेचच मतमोजणी झाली. रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
या निवडणुकीत सचिवपदी एकता मंडळाचे नरेंद्र फिरोदिया आणि प्रगती मंडळाचे डॉ. पांडुरंग डौले यांच्यात लढत झाली. नरेंद्र फिरोदिया यांना 971 अशा विक्रमी मतांनी विजयी झाले. तर, डॉ. पांडुरंग डौले यांना अवघी 270 मते मिळाली. तर संचालकपदी पवन गांधी यांनी 894 सर्वात जास्त मत मिळवली आहेत. संस्थेच्या एक हजार 620 पैकी 1 हजार 237 सभासदांनी मतदान केले. जिल्हाधिकारी या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक कोठारी व सीए किरण भंडारी यांनी काम पाहिले.
नवर्निवाचित संचालक मंडळातून उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. एकता मंडळाचे तीन विद्यमान संचालक पुन्हा निवडून आले. विरोधी प्रगती मंडळाचे सहा विद्यमान संचालक पराभूत झाले. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून क्लबची निवडणूक प्रलंबित होती.
दरम्यान, एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांनी जल्लोष करत विजय साजरा केला. यावेळी नरेंद्र फिरोदिया म्हणाले, मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या हा क्लब नगराचे वैभव आहे. क्लबच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन संचालक मंडळ कटिबद्ध आहे. सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत काम करणार आहे.
विजयी उमेदवार
पवन गांधी (811), चेतन बोगावत (865), हेमंद्र कासवा (852), सुमतीलाल कोठारी(818), प्रविण कटारिया (793), अशोक पितळे (771), जयवंत भापकर (698), सत्येन गुंदेचा (698), निळकंठ अमरापूरकर (682), अजेश धुप्पड (654). नीलेश चोपडा (700, प्रगती मंडळ).
पराभूत उमेवार
ईश्वर बोरा (624), विकी मुथा (518), संजय ताथेड(511), अभिमन्यू (467), राहुल काठेड (483), योगेश मालपाणी (400), रंगनाथ सांगळे (274 प्रगती मंडळ), अनिल बोंद्रे (540 एकता मंडळ) व अभिषेक भगत (408), किरण व्होरा (275 दोघे स्वतंत्र)