हिंगोलीतील कळमनुरीत गाेळीबार; दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार

हिंगोलीतील कळमनुरीत गाेळीबार; दोन गट भिडले; गावठी कट्यातून गोळीबार

हिंगोलीतील कळमनुरीत गाेळीबार आणि तलवार हल्ला झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून तलवारी व गावठी बंदुकीचा वापर करण्यात आला. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, यातील दोघांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

कळमनुरी शहरात सोमवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद वाढत गेल्याने दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाकडून तलवारीने वार करून गावठी कट्टयातून गोळीबार करण्यात आला. त्याचबरोबर एका गटाकडून वाहने अडवून, दहशतही निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.

यात दूध डेअरी व कॉम्प्लेक्सची तोडफोड एका घरात घुसून सामानाची नासधूस करण्यात आली. तर दुसर्‍या गटाकडूनही शिवीगाळ करून दगड, काठी, रॉड, टोअल बोअर बंदुकीने मारहाण करण्यात आली. दोन्हीं गटाकडून एक ते दीड तास झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. त्यांना उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीस देशमुख, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावर, पोलीस उप निरीक्षक सिद्दिकी आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंगोलीतील कळमनुरीत गाेळीबार आणि तलवार हल्ला झाल्याच्या या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इंदिरानगर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news