परभणी : थकबाकी भरूनही कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याचे बँकेच्या दारात उपोषण | पुढारी

परभणी : थकबाकी भरूनही कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याचे बँकेच्या दारात उपोषण

पाथरी; पुढारी वृत्तसेवा : मुळ मालकाच्या जमिनीवर घेतलेले कर्ज फेडल्यानंतर नवीन कर्ज देतो, असा बँकेने शब्द देवूनही कर्ज दिले नाही. त्यामुळे कानसूर येथील संतोष उद्धवराव पोळ या शेतकऱ्याने सोमवारी (दि.५) पाथरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर   उपोषण सुरू केले.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील कानसूर येथील संतोष उद्धवराव पोळ व गणेश उद्धवराव पोळ या दोघा भावांची कानसूर शिवारात गट क्रमांक ३३८ मध्ये शेत जमीन आहे. ही जमीन पौळ यांनी ज्या मालकाकडून खरेदी केली होती. त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ५५ हजार रुपयांचा कर्ज बोजा होता. संतोष पौळ यांनी गेल्यावर्षी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. यावेळी या बँकेच्या व्यवस्थापकांनी जुने ५५ हजारांचे कर्ज फेडल्यानंतर नवीन कर्ज देण्याचे आश्वासन दिले. बँकेने सांगितल्याप्रमाणे संतोष पोळ यांनी जुन्या कर्जाची रक्कम फेडली. त्यानंतर कर्ज देण्यास बँकेने नकार दिल्याने पोळ यांनी बँकेच्या दारात उपोषण सुरू केले.

हेही वाचा :

Back to top button