पणजी: आदिवासी (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विधिमंडळावर जाणारा आदिवासींचा मोर्चा पोलिसांनी मांडवी पुलावर अडवला. जोपर्यंत आदिवासी कल्याण मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आमच्याशी आरक्षणाबाबत चर्चा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही रस्त्यातच ठाण मांडू अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतला होता. Goa News
दरम्यान, मांडवी पुलावर पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महिला पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी पुलावर बॅरिकेड्स लावून मोर्चाला अडवून ठेवले होते. Goa News
मोर्चाचे नेतृत्व आरजी पक्षाने केले. आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा विधानभवनावर नेण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी तो मेरशी सर्कल येथे अडवला. त्यांनतर आमदार बोरकर मांडवी पुलापर्यंत कारने आले. ते पुलाच्या पलिकडून ते चालत विधानभवनात गेले. राजकीय आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लढा उभारणाऱ्या एसटी (आदिवासी) समाजाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी धोतर बनियान व मुंडासे असा पेहराव केला होता. त्याच पेहरावात ते विधानसभेत पोचले.
दरम्यान, मेरशी येथून आदिवासींनी पुढे येत मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला, तोही अडवण्यात आला.
हेही वाचा