Nashik Murder : मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून | पुढारी

Nashik Murder : मित्राच्या डोक्यात फरशी मारुन केला खून

सिडको, पुढारी वृत्तसेवा; कामटवाडे येथे किरकाळ कारणावरुन एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी मारून खून केल्याची घटना घडली आहे. संशयितास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अनंत इंगळे असे मृत व्यक्तीचे नाव असून संशयित आनंद अंबेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही कामटवाडे येथील राहणारे आहेत. देशी दारुच्या दुकानात दारु पिल्यानंतर हे दोघेही कामटवाड्याच्या दिशेने निघाले. दुचाकीवर येत असताना दोघांमध्ये शुल्लक कारणावरुन वाद झाला. गावाजवळ आल्यावर रस्त्यातच दोघांमध्ये वाद होऊन आनंद अंबेकर याने अनंत इंगळे याच्या डोक्यात फरशी मारुन त्याचा खून केला.

Back to top button